ऑलम्पिक खेळाडूंनी देशा साठी पदके जिंकवीत: अजित पवार
खेळाडू चा उत्साह व आत्मविश्वास वाढावा म्हणून सदर उपक्रम सुरू केला

ऑलम्पिक खेळाडूंनी देशा साठी पदके जिंकवीत: अजित पवार
खेळाडू चा उत्साह व आत्मविश्वास वाढावा म्हणून सदर उपक्रम सुरू केला
बारामती वार्तापत्र
टोकियो येथे होत असलेल्या ऑलम्पिक मध्ये खेळाडू नी देशासाठी पदकाची लयलूट करावी व देशाचे नाव सर्व जगात करावे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे केली.
शनिवार 10 जुलै रोजी शासनाच्या वतीने ऑलिम्पिक साठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूना शुभेच्छा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट चे शुभारंभ व शुभेच्छा च्या बॅनर चे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूना शुभेच्छा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे व शुभेच्छा बॅनरचे उदघाटन क्रिडा संकुल, बारामती येथे करून खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके मिळवावीत व देशाचे नाव उंच करावे यासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,गटनेते सचिन सातव गटनेता , बारामती बँकेचे व्हा चेअरमन प्रांताधिकारी ,दादासाहेब कांबळे उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक हनुमंत पाटील, ,सा, बा. विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद,बारभाई, उपअभियंता एम व्ही ओहोळ तहसीलदार विजय पाटील, प्रो कबड्डी खेळाडू दादासो आव्हाड आदी उपस्तीत होते या कार्यक्रमाचे नियोजन तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले होते.
खेळाडू चा उत्साह व आत्मविश्वास वाढावा म्हणून सदर उपक्रम सुरू केला असल्याची माहिती जगन्नाथ लकडे यांनी दिली