राजगुरुनगर शहरात लेकीच्या भेटीला आलेला असताना तडिपार गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर तडिपार गुंडाची पुण्यात हत्या, मुख्य आरोपीसह दोघे काही तासात अटक
मध्यरात्रीच्या सुमारास राहुलवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला.

राजगुरुनगर शहरात लेकीच्या भेटीला आलेला असताना तडिपार गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर तडिपार गुंडाची पुण्यात हत्या, मुख्य आरोपीसह दोघे काही तासात अटक
मध्यरात्रीच्या सुमारास राहुलवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला.
क्राईम ; बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यात झालेल्या कुख्यात गुंडाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. राहुल उर्फ पप्पू वाडेकर या तडीपार गुंडाच्या खून प्रकरणी मुख्य आरोपीसह दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रविवारी लेकीला भेटायला आला असताना गोळीबार करुन, आणि नंतर डोक्यात दगड टाकून आरोपींनी राहुलला संपवलं होतं.
एकाच दिवशी दोन गुंडांच्या हत्या
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन कुख्यात गुंडांच्या हत्या झाल्यामुळे रविवारी पुणे हादरलं होतं. खेड-राजगुरु नगरमध्ये राहुल उर्फ पप्पू वाडेकर या तडीपार गुंडाची हत्या करण्यात आली होती. गोळीबारानंतर डोक्यात दगड टाकून राहुलला संपवण्यात आलं होतं, तर त्याच दिवशी म्हणजेच रविवारी दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकिर्वे या गुंडाची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली होती.
पप्पू वाडेकर हत्ये प्रकरणी दोघे गजाआड
यापैकी राजगुरुनगर शहरालगत झालेल्या पप्पू वाडेकरच्या खुनाचा उलगडा झाला आहे. पुणे ग्रामीण विभागाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. मुख्य आरोपी मिलिंद जगदाळेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. तर अजूनही तीन आरोपी फरार आहेत.
कशी झाली होती हत्या?
राजगुरुनगर शहरात लेकीच्या भेटीला आलेला असताना तडिपार गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर याची पाबळ रोडवर निर्घृण हत्या करण्यात आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास राहुलवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर डोक्यात दगड टाकून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
आरोपींना अटक
तडिपारीचा आदेश झुगारुन प्रवेश
पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा अंदाज खेड पोलिसांनी आधीच वर्तवला होता. राहुल उर्फ पप्पू वाडेकर याला चार महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तडिपारीचा आदेश झुगारत त्याने खेड राजगुरुनगर शहरात प्रवेश केला, त्यावेळी त्याची हत्या झाली. या प्रकरणी राजगुरुनगर पोलीसांत मुख्य आरोपी मिलिंद जगदाळेसह पाच जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची कारवाई
मा.पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख साो. मा. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. लंभाते सो. यांचे मागदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट
सपोनि सचिन काळे,सपोनि. नेताजी गंधारे, सहा फौजदार राजेंद्र थोरात, पो. हवा. विक्रम तापकिर, पो. हवा. ज्ञानेश्वर श्रीरसागर, पो. हवा. जनार्धन शेळके, पो. हवा. राजु मोमीन,पो. हवा. दिपक साबळे, पो. हवा. सचिन गायकवाड, पो. ना. मंगेश थिगळे, पो. ना. अजित भुजबळ, पो. ना. संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, पो. कॉ. निलेश सुपेकर, चा. सहा फौजदार, राजापुरे, पो. कॉ. अक्षय जावळे.