बारामती शहर पोलीसाची दबंग कामगिरी चार तासात चोरीच्या गुन्हयाचा उलघडा करून मुद्देमालासह आरोपी ताब्यात
तिचे नाव अक्काताई राजा काळे, वय ६५ वर्ष, रा. गोखळी फाटा ता. बारामती जि. पुणे असे आहे.

बारामती शहर पोलीसाची दबंग कामगिरी चार तासात चोरीच्या गुन्हयाचा उलघडा करून मुद्देमालासह आरोपी ताब्यात
तिचे नाव अक्काताई राजा काळे, वय ६५ वर्ष, रा. गोखळी फाटा ता. बारामती जि. पुणे असे आहे.
क्राईम; बारामती वार्तापत्र
तीनचाकी टेम्पोत असलेल्या पर्समधील कानातील कर्णफुले, सोन्याच्या रिंगा व १ हजार रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी अक्काताई राजा काळे (वय ६५ वर्ष) (रा. गोखळी फाटा ता. बारामती जि. पुणे) यांना बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान तिच्याकडून एकूण ३९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ.भाग्यश्री विजय जगताप (रा. मलठण ता.फलटण जि.सातारा) त्यांच्या मालकीचे तीन चाकी टेम्पो नंबर (एम.एच.११/ए.जी. ६५६८) या मधून त्यांचे पती, दुसरी बहीण रूपाली असे लहान मुलासह मौजे रूई ता. बारामती येथे बहिण राजश्री भोसले हिला भेटण्यासाठी जात असताना (दि:१४) रोजी सकाळी साडे दहाच्या वाजेच्या सुमारास गुणवडी चौक बारामती येथे टेम्पो थांबवुन फिर्यादी व त्यांची बहिण रूपाली हे दोघीजनी त्यांचे पर्स व साहित्य टेम्पोचे कॅबीनमध्ये ठेऊन मिठाईच्या दुकानात मिठाई घेण्यासाठी गेले .
टेम्पोमध्ये लहान मुले असल्याने फिर्यादीचे पती विजय जगताप हे टेम्पोच्या मागील बाजूस मुलांजवळ उभे राहिले.
त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने अचानक पणे येऊन टेम्पोच्या केबिन मधील पर्स काढुन चोरून नेहली. फिर्यादी हे टेम्पोच्या जवळ आल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. व त्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी लगेचच बारामती शहर पोलीस स्टेशनकडे मदतीसाठी धाव घेत सदर घडलेली हकीकत सांगितली.
सदर पर्स मधील २५ हजार रूपये किंमतीचे कानातील कर्णफुले, १३ हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या रिंगा व १ हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये ५०० रूपये दराच्या २ नोटा असा एकूण ३९ हजार रूपये किंमतीचा माल चोरून नेल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार सहा फौज माळी यांना सांगितली.
त्यांनी लगेचच सदरची माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या निर्दषनास आणून दिली.
शिंदे यांनी कोणताही विलंब न करता त्यांनी लगेचच सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलिस हवालदार गोपाळ ओमासे, मपोना राजश्री आटोळे, पोलस नाईक नुतन जाधव, पोलिस कॉन्स्टेबल बंडु यांना घटना स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस टीमने लगेचच घटना स्थळी रवाना झाले.
मिळालेल्या माहितीनुसार घटना स्थळावर एक अज्ञात महिला त्या परिसरात वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्त झालेल्या तिच्या वर्णनाप्रमाणे पोलीसांनी शोध चालु करून वेगवेगळया दिशेने जाणारे रोडचे परिसरात शोध सुरू केला.
यामध्ये मळद गावच्या हद्दीत क-हा नदीच्या पात्रातील काटवानात एक महिला आपले अस्त्वि लपवत असल्याचे दिसल्यास मपोना राजश्री आटोळे यांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले.
दरम्यान यावेळी तिच्याजवळ सदर मुद्देमाल मिळून आला. तिची अधिक विचारपुस केली असता तिने आपले नाव अक्काताई राजा काळे (वय ६५ वर्ष) (रा. गोखळी फाटा ता. बारामती जि. पुणे) असे सांगितले आहे. दरम्यान आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, ठाणे अंमलदार सहा. फौज. माळी, पोलीस हवालदार गोपाळ ओमासे, मपोना राजश्री आटोळे, पोलिस नाईक नुतन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल बंडु कोठे, पोलीस कॉन्स्टेबल महेश माने यांनी केली.