क्राईम रिपोर्ट

नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार

पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक घटनास्थळी दाखल

नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार

पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक घटनास्थळी दाखल

क्राईम; बारामती वार्तापत्र

पुण्याचा पुरंदर तालुका आज (16 जुलै) संध्याकाळी हत्येच्या घटनेने हादरला आहे. नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर (वय 41) याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित गोळीबाराची घटना ही संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेला. त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटनेची माहिती मिळताच नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गुंड गणेश विठ्ठल रासकर हा सायंकाळी सात वाजता नीरा येथील पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील एस्टी स्टँडनजीक पल्सर गाडीवर आला होता. यावेळी त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी फरार झाले.

रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित

गणेश रासकर याच्या डोक्याच्या मागच्या भागात खोलवर जखम झाली. त्याला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं. त्यानंतर पुढील सोपस्करासाठी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात म्रुतदेह पाठवण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button