राज्यातील पाचवी आणि आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट रोजी होणार
कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.
राज्यातील पाचवी आणि आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट रोजी होणार
कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.
पुणे:बारामती वार्तापत्र
राज्यातील पाचवी आणि आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली होती.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या 8 ऑगस्ट रोजी होईल. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे 10 लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 6 लाख 28 हजार 630 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी झाली आहे. यामध्ये इयत्ता पाचवीच्या 3 लाख 86 हजार 328 तर इयत्ता आठवीच्या 2 लाख 42 हजार 302 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.