पांडुरंगाची पालखी अरणला आणावी अशी ना. अजितदादा पवार यांच्याकडे सावता परिषदेची मागणी.
७ ऑगस्ट रोजी सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पांडुरंगाची पालखी अरणमध्ये आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2021/08/dd6c4a53-24c1-4c88-b4fc-8ba7c3b2faa1-780x470.jpg)
पांडुरंगाची पालखी अरणला आणावी अशी ना. अजितदादा पवार यांच्याकडे सावता परिषदेची मागणी.
७ ऑगस्ट रोजी सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पांडुरंगाची पालखी अरणमध्ये आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू
बारामती वार्तापत्र
संतशिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पंढरपुरहून पांडुरंगाची पालखी सावता महाराज यांची जन्मभूमी श्रीक्षेत्र अरण येथे येण्याची मोठी आख्यायिका असलेली शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे.
त्यामुळे श्री विठ्ठलाची पालखी पंढरपुरहून अरणला शिवशाही बसमधुन आणण्यासाठी शासनस्तरावर व्यवस्था करून पालखीची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा अखंड सुरू ठेवावी अशी आग्रही मागणी सावता परिषदेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या कठोर निर्बंधांच्या काळातही ना.अजितदादा यांच्यामुळे श्री विठ्ठलाच्या पादुका वाहनाद्वारे अरणला आणुन देव व भक्त भेटीची परंपरा अखंडीत राहिली गेली. आताही कोरोनाचे निर्बंध कायम आहेत. परंतु मागील वर्षीप्रमाणे यावेळी देखील कोव्हीडच्या नियमांचे काटेकोर पालन करून पांडुरंगाची पालखी अरणला आणण्याची शासन स्तरावरून परवानगी द्यावी अशी आग्रहपूर्वक विनंती ना.अजितदादा यांना सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी केली आहे. ना.अजितदादा पवार यांनी यासाठी अत्यंत सकारात्मकदृष्ट्या संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या असून दिनांक ७ ऑगस्ट रोजी सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पांडुरंगाची पालखी अरणमध्ये आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याची माहिती श्री. कल्याण आखाडे यांनी दिली आहे.