जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते बावड्याला रुग्णवाहिकेचे लोकार्पण
ʼʼगोल्डन आवर्सʼʼ मध्ये रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपयोगी ठरणार
जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते बावड्याला रुग्णवाहिकेचे लोकार्पण
ʼʼगोल्डन आवर्सʼʼ मध्ये रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपयोगी ठरणार
इंदापूर : प्रतिनिधी
बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १४ व्या वित्त आयोगातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नवीन रुग्णवाहिका खरेदी केली आहे. या रुग्णवाहिकेचे मंगळवारी (दि.३) बावडा येथे पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना अंकिता पाटील म्हणाल्या की, गरजू,गरीब रुग्णांना मोफत रुग्णवाहिका सेवा मिळावी तसेच ʼʼगोल्डन आवर्सʼʼ मध्ये रुग्णांना उपचार मिळावे याकरिता ही रुग्णवाहिका उपयोगी ठरणार आहे.या मोफत रुग्णवाहिकेचा १०८ नंबरला कॉल करून गरजूंनी लाभ घ्यावा.
यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा घोगरे, बावडा ग्रामपंचायतचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, ग्रामपंचायत सदस्य दादा कांबळे, गोंदी गावचे सरपंच रणजित वाघमोडे, उपसरपंच अंगद देशमुख, ग्रामविस्तार अधिकारी अंबिका पावसे, नवनाथ नष्टे, भगवान घोगरे,गणेश लंबाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिलकुमार वाघमारे, डॉ. विनोद घोगरे, ग्रामस्थ तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.