मांजा विक्री करणार्यावर कारवाई करा ; अखिल भारतीय मराठा सेवा संघाची मागणी
सदरील मागणीसंदर्भात पोलीसांना दिले निवेदन
मांजा विक्री करणार्यावर कारवाई करा ; अखिल भारतीय मराठा सेवा संघाची मागणी
सदरील मागणीसंदर्भात पोलीसांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
मकरसंक्रातीचा सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात मांजा व पंतग खरेदीसाठी गर्दी होत असते. मात्र बाजारात बंदी असलेल्या चायना मांजाची सर्रास विक्री होत आहे. या मांजामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे मांजा विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाने केली असून यासंदर्भात इंदापूर पोलिसांना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे.
पुढच्या आठवड्यामध्ये पंचमीचा सण येत आहे आणि या सणांमध्ये पतंग उडवल्या जातात. यासाठी दोरा साध्या पद्धतीचा असणे गरजेचे आहे परंतु अतिशय घातक अशा चायनीज मांजाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. या दोऱ्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये अकलूज या ठिकाणी एका व्यक्तीला जीव गमवावा लागला तसेच पाठीमागील काळातील याबाबतची बरेचशी उदाहरणे आहेत. त्यामुळे या गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करून मांजा विक्रीवर आणि वापरावर बंदी असताना देखील जे विक्रेते हा दोरा विकत असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे तालुका कार्याध्यक्ष सचिन जाधव, प्रवीण पवार, निवास शेळके, विशाल मेंगडे, नितीन चौधरी, भारत जामदार, रामहरी जाधव, शिवाजी बोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.