क्राईम रिपोर्ट

पुण्यात खून झालेल्या एका सराईत गुन्हेगाराचा कोयते, पिस्तुल चालवत साजरा केला वाढदिवस

7 जुलै रोजी त्याचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या घरासमोर 10 ते 15 जण एकत्र जमले होते.

पुण्यात खून झालेल्या एका सराईत गुन्हेगाराचा कोयते, पिस्तुल चालवत साजरा केला वाढदिवस

7 जुलै रोजी त्याचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या घरासमोर 10 ते 15 जण एकत्र जमले होते.

क्राईम ;बारामती वार्तापत्र

खून झालेल्या एका सराईत गुन्हेगाराचा बिबवेवाडी परिसरातून वाढदिवस साजरा करताना हवेत पिस्तुल फिरवताना जयघोष करण्यात आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करीत अक्षय उर्फ प्रसाद कानिटकर (वय 22, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे.

गुंड भावेश कांबळे याचा काही दिवसांपूर्वी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाला होता. 7 जुलै रोजी त्याचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या घरासमोर 10 ते 15 जण एकत्र जमले होते. यांनी भावेश कांबळे याच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. काहींनी तर हवेत कोयते आणि गावठी पिस्तुल उडवत त्याच्या नावाचा जयघोष केला. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.

याआधीही घडला असाच प्रकार
काही दिवसांपूर्वी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून झाला होता. त्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांनी दुचाकी रॅली काढली होती. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही असा प्रकार घडल्यानंतर पोलिसांवर चहूबाजूने टीका झाली होती. त्यानंतर पोलिसांनी 100 जणांना ताब्यात घेतले होते.

Related Articles

Back to top button