फुले कृषी विज्ञान केंद्राने बनवलेली द्राक्ष नियमावली बागायतदारांसाठी मार्गदर्शक- भाऊसो रुपनवर
इंदापूर येथे द्राक्ष नियमावली प्रकाशन सोहळा संपन्न
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2021/08/b6551f85-0d12-4ddd-9464-086429a40478-780x470.jpg)
फुले कृषी विज्ञान केंद्राने बनवलेली द्राक्ष नियमावली बागायतदारांसाठी मार्गदर्शक- भाऊसो रुपनवर
इंदापूर येथे द्राक्ष नियमावली प्रकाशन सोहळा संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राने बनविलेली द्राक्ष नियमावली बागायतदारांसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावेल असे उद्गार तालुका कृषी अधिकारी भाऊसो रुपनवर यांनी काढले. इंदापूर येथे द्राक्ष नियमावली प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कामगारांची कमतरता असताना देखील बागायतदारांनी खरड छाटणी मध्ये द्राक्ष बागांचे चांगले काम केल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमांमध्ये द्राक्ष काड्यांतील डोळ्यांमध्ये घड निर्मिती तपासणी प्रयोगशाळेचे प्रातिनिधिक स्वरुपात उद्घाटनही तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. द्राक्ष बागायतदारांना लागणारे शास्त्रीय ज्ञान महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र पूरवीत असल्याबद्दल त्यांनी वाघमोडे बंधूंचे कौतुक केले. आपल्या भागामध्ये असणाऱ्या रंगीत द्राक्ष वाणांच्या फळ छाटण्यांना सुरुवात झाली असून सर्व द्राक्ष बागायतदारांनी एकाच वेळी फळ छाटणी न करता टप्प्याटप्प्याने करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच द्राक्ष पिकावर आधारित एखादा उद्योग सुरू करण्याचे सुचविले.
सदर द्राक्ष उत्पादन नियमावली राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने केलेल्या शिफारशींच्या आधारावर बनवल्याचे महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी, आबासाहेब रुपनवर द्राक्ष बागायतदार संपत बुटे,सतीश शिंदे,विजय जगताप, प्रसाद गारटकर,शिवाजी करे,मखरे गुरुजी,संतोष जाधव, कैलास चितळकर इत्यादी उपस्थित होते. आभार सुधीर वाघमोडे यांनी मानले.