सातारा

भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना करोनाचा संसर्ग

पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उदयनराजेंवर उपचार सुरू आहेत.

भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना करोनाचा संसर्ग

पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उदयनराजेंवर उपचार सुरू आहेत.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

खासदार उदयनराजे भोसले यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये मागील चार दिवसांपासून उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतून परतल्यानंतर उदयनराजे यांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

खासदार उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या सुरुवातीला करोनाबाधित झाल्या होत्या. त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मातोश्री कल्पनाराजेंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्याने खासदार उदयनराजे दिल्लीहून अधिवेशन सोडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते.

यावेळी संपर्कात आल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ लागला होता व काही लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्ता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितले. तसेच, पुढील एकदोन दिवसात त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असे देखील त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तर त्यांच्या मातोश्रींनाही घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram