अखिल काँग्रेस किसान कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी डॉ.संतोष होगले
जिल्हाध्यक्षांनी दिले निवडीचे पत्र

अखिल काँग्रेस किसान कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी डॉ.संतोष होगले
जिल्हाध्यक्षांनी दिले निवडीचे पत्र
इंदापूर : प्रतिनिधी
अखिल काँग्रेस किसान कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी डॉ.संतोष होगले यांची निवड करण्यात आली आहे.रविवारी ( दि.१५ ) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांच्याहस्ते व किसान कमिटीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे-पाटील यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीचा दृष्टीकोन व राष्ट्रीय सचिव राहुल गांधी,अखिल किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे प्रभावीपणे काम करावे अशी अपेक्षा निवडपत्रकाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांचे पुढील उद्धिष्ट,शेतकरी,शेती व शेतमजूर यांचे काँग्रेस विचाराचे धोरण मजबूत करण्यासाठी तसेच पक्ष संघटनेचा विकास काँग्रेस पक्षाचा जनाधार प्राप्त होईल असे कार्य करावे असे निवड पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना डॉ.संतोष होगले म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,आमदार संजय जगताप,किसान कमिटीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे-पाटील,तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका किसान सेलच्या माध्यमातून करून काँग्रेस पक्ष व संघटन वाढीसाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे.