शैक्षणिक

टेक्निकलची सई पवार NMMS परीक्षेत पुणे जिल्ह्यात दुसरी

सर्व विषय शिक्षक यांचे अभिनंदन

टेक्निकलची सई पवार NMMS परीक्षेत पुणे जिल्ह्यात दुसरी

सर्व विषय शिक्षक यांचे अभिनंदन

बारामती वार्तापत्र

बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय बारामती या विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक व दृबल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत(NMMS) घवघवीत यश संपादन केले आहे.या विद्यालयातील कु.सई अरविंद पवार हिने 154 गुण मिळवत पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.त्याचबरोबर कदम स्वानंद किशोर व कळसाईत ओम दत्तात्रय याही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे.

या तिन्ही विद्यार्थाना इ 9 वी ते 12 वी पर्यंत प्रतिवर्षी 12हजार रुपये प्रमाणे एकूण 48000 हजार रुपये प्रत्येकी शिष्यवृत्ती मिळणार आहे.केंद्रशासनाच्या माध्यमातून आर्थिक दृबल घटकातील इ 8 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल NMMS विभागप्रमुख श्री सोमनाथ मिंड सर ,सहाय्यक विभाग प्रमुख श्री विकास जाधव सर व सर्व विषय शिक्षक यांचे अभिनंदन स्थानीय स्कूल कंमिटी सदस्य श्री सदाशिव(बापू) सातव ,विद्यालयाचे प्रा.श्री राजेंद्र काकडे,उपमुख्याध्यापक श्री देवडे सर,पर्यवेक्षक श्री जाधव सर,रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद श्री बंडू पवार,आजीव सदस्य श्री अर्जुन मलगुंडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram