बारामती: दि. 20 ऑगस्ट नविन 75 जण कोरोना बाधित. म्युकरमायकोसिस चे 39 तर 68 जण कोरोना मुक्त.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02

बारामती: दि. 20 ऑगस्ट नविन 75 जण कोरोना बाधित. म्युकरमायकोसिस चे 39 तर 68 जण कोरोना मुक्त.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
बारामती वार्तापत्र
बारामतीतील रुग्णसंख्या गेल्या सात दिवसात अशीच कायम चढती राहिली आहे. 13 ऑगस्ट रोजी बारामतीत 42 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले होते. 15 ऑगस्ट रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे तसेच शासकीय सुट्टी असल्यामुळे ही रुग्ण संख्या 16 वर घसरली होती. मात्र 16 ऑगस्ट रोजी हीच संख्या 78 वर पोचली. 17 ऑगस्ट रोजी ही संख्या 71 वर राहिली, 18 ऑगस्ट रोजी ती 64 वर होती, तर 19 ऑगस्ट रोजी दिवसभरात झालेल्या तपासणीत आढळलेली रुग्ण संख्या 75 एवढी आहे.
आजपर्यंत बारामतीत मागील दीड वर्षात मिळून 27944 रुग्ण झाले असून आत्तापर्यंत 26 हजार 887 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मागील दोन दिवसांमध्ये बारामतीत उपचार घेत असलेल्या नऊ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील सहा रुग्णांचा मृत्यू आज दिवसभरात झाला असल्याची माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आज (ता.२०) दिवसभरात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती दिली. यातील 3 जण बारामती तालुक्यातील तर 3 जण बाहेरील तालुक्यातील असल्याचे त्यांनी सांगितले..
आज बारामती शहरात 22 आणि बारामती ग्रामीण मध्ये 53 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 463 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 33 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 7 पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 64 नमुन्यांपैकी 2 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 1001 नमुन्यांपैकी एकूण 40 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 75 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 27944 झाली आहे, 26887 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 704 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 68 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.






