माजी नगरसेवक,अभिजीत काळे या सच्च्या कार्यकर्त्याला अजितदादाचा प्रेमाचा सल्ला
स्वत:च्या रक्तानं लिहिलेल्या पत्राद्वारे अजित पवारांना शुभेच्छा

माजी नगरसेवक,अभिजीत काळे या सच्च्या कार्यकर्त्याला अजितदादाचा प्रेमाचा सल्ला
स्वत:च्या रक्तानं लिहिलेल्या पत्राद्वारे अजित पवारांना शुभेच्छा
बारामती वार्तापत्र
बारामतीतील माजी नगरसेवक अभिजीत काळे यांनी आपल्या रक्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शुभेच्छा पत्र लिहिलं होतं. हे पत्र काळे यांनी आज अजित पवार यांना भेट दिलं. यावेळी अजितदादांची कार्यकर्त्यांबाबत असलेली आस्था बारामतीकरांना अनुभवायला मिळाली. मात्र, अजित पवार यांनीही आपल्या कार्यकर्त्याला सल्ला दिलाय. “अरे तुमचं माझ्यावर प्रेम आहे; पण असं नाही करायचं”, असा सल्ला देत अजितदादांनी कार्यकर्त्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या. स्पष्टवक्ता, परखड आणि शिस्तप्रिय म्हणून अजितदादांची राज्यात ओळख आहे. मात्र कार्यकर्त्यांबद्दल आस्था बाळगणारे अजितदादा आज बारामतीकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले.
. काळे हे बारामतीमधील माजी नगरसेवक आहेत. काळे यांनी स्वत:च्या रक्तानं लिहिलेल्या पत्राद्वारे अजित पवारांना शुभेच्छा दिल्यात. अजित पवार यांनीही आपल्या कार्यकर्त्याच्या शुभेच्छा तेवढ्याच प्रेमाने स्वीकारल्या. मात्र, त्यावेळी एक प्रेमाचा सल्ला द्यायलाही अजितदादा विसरले नाहीत.