स्थानिक

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखवून दिलं स्वच्छतेचं महत्त्व..

गेल्या काही वर्षात बारामतीचा चेहरामोहरा बदलला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखवून दिलं स्वच्छतेचं महत्त्व..

गेल्या काही वर्षात बारामतीचा चेहरामोहरा बदलला आहे.

बारामती वार्तापत्र

अजित पवार यांच्याकडून स्वच्छतेला देण्यात येणार महत्व यापूर्वी अनेकदा दिसून आलं आहे. कोविड केअर सेंटरच्या उभारणीसाठी अजित पवार दाखल झाल्यानंतर गाडीतून खाली उतरल्यानंतर त्यांना कचरा दिसून आला तो त्यांनी लगेच उचलला. यामुळे अजित पवार यांच्याकडून स्वच्छतेचं महत्व पुन्हा अधोरेखित झालं आहे.

कोरोनामुळं आरोग्य सेवा कशा असाव्यात हे समजलं

बारामतीमध्ये पोर्टेबल कोविड केअर सेंटरचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

अमेरिकन इंडिया फाउंडेशन आणि मास्टर कार्डच्या माध्यमातून कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. अजित पवार यांनी यावेळी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.कोरोनाचं संकट सर्वांवर आलं, या संकटानंतर आरोग्य सेवा अधिक चांगल्या प्रकारे कशी द्यावी हे समजलं आहे. जुन्या काळात प्लेगची साथ आली होती त्यात अनेकजण मृत्यूमुखी पडले. कोरोना एवढा जीवघेणा ठरेल किंवा जग स्तब्ध होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं, असं अजित पवार म्हणाले.

 

Back to top button