
सरडेवाडी येथे आढळला अज्ञात चिमुकलीचा मृतदेह
इंदापूर पोलिसात खबर दाखल
इंदापूर : प्रतिनिधी
बुधवारी ( दि.२५ ) पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बामणस्थळ याठिकाणी सुमारे दोन ते तीन वर्षे वय असणाऱ्या अज्ञात बालिकेचा मृतदेह गुराख्याना आढळून आला आहे.
त्यांनी सदरची घटना सरपंच सिताराम जानकर यांना सांगितली.जानकर यांनी तात्काळ इंदापूर पोलिसांना खबर देऊन १०८ रुग्णवाहिकेस बोलविले.तोपर्यत सरडेवाडी टोल नाका प्रशासनाची रुग्णवाहिका दाखल झाली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हे वृत्त लिहिपर्यंत याबाबत इंदापूर पोलिसात इतर कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही.