राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा सुरु करण्यासंदर्भात एक महत्वाचं विधान!
शिक्षकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबवणार
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा सुरु करण्यासंदर्भात एक महत्वाचं विधान!
शिक्षकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबवणार
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा सुरु करण्यासंदर्भात एक महत्वाचं विधान केलं आहे. राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्या बाबत टास्क फोर्सचा शाळा आणि जिल्हे सुरू करण्याबत विचार सुरु आहे. तसेच 5 तारखे पर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राइव्ह घेणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सचा विचार सुरु असल्याचं सांगितल्यानं नेमका निर्णय कधी होणार याची वाट पाहावी लागणार आहे.
शिक्षकांच्या लसीकरणासाठी मोहीम
शिक्षकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. 5 तारखे पर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राईव्ह घेणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्या बाबत टास्क फोर्सचा शाळा आणि जिल्हे सुरू करण्याबत विचार सुरु आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांचं लसीकरण करुन घेणं आवश्यक असल्यानं यासंदर्भात राज्य सरकारकडून पावलं टाकण्यात येत आहेत.