मंदी मध्ये संधी तरुणांना एमआयडीसी मध्ये नोकरीची संधी.

नामांकित कंपनीत रोजगार मिळणार ,अर्ज करण्याचे आव्हान.

मंदी मध्ये संधी तरुणांना एमआयडीसी मध्ये नोकरीची संधी.

नामांकित कंपनीत रोजगार मिळणार ,अर्ज करण्याचे आव्हान.

बारामती: कोरोना,संचारबंदी, मंदी असताना सुद्धा बारामती एमआयडीसी मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीमध्ये 200 कामगारांची भरती तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिली. कोरोनाच्या संचारबंदीत परराज्यातील अनेक कामगार घरी गेल्याने अनेक कंपनीत कुशल व अकुशल मनुष्यबळ कमतरता जाणवत आहे. त्यामुळे कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी बेरोजगार युवक युवतींनी पुढे येणे गरजेचे आहे. आयटीआय मेकॅनिकल, मेकॅनिकल डिप्लोमा इन इंजिनिअरिंग व बीई मेकॅनिकल शैक्षणिक पात्रता असलेल्या बेरोजगार युवक युवतींना ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
या काळात आयटीआय झालेल्यांना 12 हजार, डिप्लोमाधारकास 12 हजार 500, तर डिग्रीधारकास 13 हजार 125 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. त्यांना सकाळी साडेआठ ते दुपारी 1 वाजेपर्यंत उपहारगृहसेवा उपलब्ध आहे.

या नोकरीसाठी आयटीआय गुणपत्रकाची झेरॉक्स, दहावी गुणपत्रिकेची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, 4 पासपोर्ट साइज फोटो घेऊन युवक युवतींनी बारामती एमआयडीसीतील बीएसएनएल कार्यालयामागील यशस्वी अकॅडमी फॉर स्किल कार्यालयात दूरध्वनी क्रमांक 02112243760, खाडे सर (मो : 9890200085 / 9075623648) किंवा राखुंडे सर (मो : 7350014484) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन गारटकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!