इंदापूर

…यालाच म्हणतात चटणी देऊन पिठलं घेण् ! इंदापुरातील प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

रस्त्यावर पडलेल्या दोन-चार नोटा घेण्याच्या नादात २ लाख ३३ हजार गमावले

…यालाच म्हणतात चटणी देऊन पिठलं घेण् ! इंदापुरातील प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

रस्त्यावर पडलेल्या दोन-चार नोटा घेण्याच्या नादात २ लाख ३३ हजार गमावले

इंदापूर : प्रतिनिधी
चटणी देऊन पिठलं घेण् या म्हणीस शोभेल असाच प्रकार इंदापूर शहरात घडला असून सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.लबाडीच्या उद्देशाने रस्त्यावर टाकलेल्या दोन-चार नोटा घेण्यासाठी दुचाकी वरून खाली उतरलेल्या दूचाकी स्वराचे २ लाख ३३ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना गुरुवारी ( दि.१६ ) दुपारी साडेबाराच्या सुमारास इंदापूर शहरात घडली असून याबाबत विकास मानसिंग भोसले ( वय ४२ ) रा.डाळज नं.१ यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

सविस्तर हकीकत अशी की,इंदापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमधून दोन लाख तेहतीस हजार रुपये घेऊन घराच्या दिशेने जात असताना इंदापूर शहरातील हिरो मोटार सायकल शोरूम जवळ रस्त्यावर अज्ञातांनी लबाडीच्या उद्देशाने टाकलेल्या दोन-चार नोटा उचलण्याच्या नादात विकास मानसिंग भोसले यांच्या मोटार सायकलच्या हँडलला अडकवलेली पैश्याची पिशवी अज्ञात चोरांनी लंपास केली असून सदरील चोरी प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर धनवे करीत आहेत.

Related Articles

Back to top button