जिह्ला न्यायालय बारामती व बारामती वकील संघटनेच्या वतीने लसीकरण कॅम्प यशस्वी रित्या संपन्न
100 पाञ वकील बंधू भगिनीनी व न्यायालयीन कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले

जिह्ला न्यायालय बारामती व बारामती वकील संघटनेच्या वतीने लसीकरण कॅम्प यशस्वी रित्या संपन्न
100 पाञ वकील बंधू भगिनीनी व न्यायालयीन कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले
बारामती वार्तापत्र
दिनांक 18/9/2021 रोजी बारामती येथील मा न्यायाधीश वकील व न्यायालयीन कर्मचारीवर्ग बंधू भगिनी यांचे करता कोवीङ लसीकरण कॅम्पचे आयोजन महिला हाॅस्पिटल बारामती येथे करण्यात आले होते नियमानुसार ज्यांनी पहिला लसीकरण ङोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी व वकील बंधू-भगिनीं यांनी पहिल्या व दुसरे डोस करीता आपली नावे संघटनेकडे नोंदली होती अशाच 100 पाञ वकील बंधू भगिनीनी व न्यायालयीन कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले होते
सदर लसीकरण कॅम्पचे उद्घाटन बारामती येथील मे जिल्हा व सत्र न्यायाधीश मा जे पी दरेकर मॅडम यांच्या हस्ते लसीकरण कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी महिला हाॅस्पीटलचे ङाॅ.बापु भोई ङाॅ.सदानंद काळे तालुका आरोग्य अधिकारीङाॅ मनोज खोमणे व न्यायालयीन कर्मचारीवर्ग, वकील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालयाचे नाझर श्री सुभेदार भाऊसाहेब व वकील संघटनेचे अध्यक्ष अॅङ चंद्रकांत सोकटे ,उपाध्यक्ष अॅङ शिंगाडे, स्नेहा भापकर सचिव अॅङ अजित बनसोडे, सहसचिव गणेश शेलार व महिला प्रतिनिधी प्रणिता जावळे व सर्व कार्यकारणी यांनी परिश्रम घेतले