वाई तालुक्यातील सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार
हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे.
वाई तालुक्यातील सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार
हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे.
सातारा – बारामती वार्तापत्र
वाई तालुक्यातील सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे. दरम्यान हा प्रकार स्थानिक युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.
घटनास्थळी वाईच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यावेळी तिच्यासमोर विविध साहित्य मांडल्याचे दिसत होते. यावेळी तिथे गेलेल्या स्थानिक तरुणांना ‘तिला त्रास होत होता म्हणून हे करत आहे, फक्त कोंबडा मारुन नेणार आहोत’ असं एका महिलेने सांगितले. हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.
भुईंज पोलिसांत गुन्हा दाखल –
अंनिसची मागणी –
अल्पवयीन मुलीला ‘बाहेरची बाधा’ झाली असे समजून अघोरी पूजा घालण्यास भाग पाडणाऱ्या मांत्रिकाचा त्वरित शोध पोलिसांनी घ्यावा. संबंधितांवर जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सातारा जिल्हा अंनिसच्या वतीने प्रशांत पोतदार यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना केली.
यापूर्वी पोलिसांनी केला होता हस्तक्षेप –
मांढरदेव (ता वाई) येथील काळूबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक दावजी पाटील मंदिरात दर्शनासाठी भेट देत असतात. सुरूर (ता. वाई) या गावातील धावजी पाटील या मंदिरात तांत्रिक मांत्रिक काही अघोरी प्रकार करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर पूजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या मंदिर परिसरातील बाहेरून येणाऱ्या पूजाऱ्यांचे तंत्र-मंत्र प्रकार पोलीस हस्तक्षेपाने बंद झाले होते. सुरूर (ता. वाई) येथील स्मशानभूमी या मंदिरापासून काही अंतरावरच आहे. तिथेच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.