हरियाणा राज्यातील कैथल जिल्ह्यात येथील देशात प्रसिद्ध असलेल्या व 21 कोटींची बोली लागलेल्या ‘सुलतान’ रेड्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सुलतान हा देशातील सर्वच पशु मेळाव्यांमध्ये नेहमीच आकर्षणाचा विषय राहत होता.

हरियाणा राज्यातील कैथल जिल्ह्यात येथील देशात प्रसिद्ध असलेल्या व 21 कोटींची बोली लागलेल्या ‘सुलतान’ रेड्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सुलतान हा देशातील सर्वच पशु मेळाव्यांमध्ये नेहमीच आकर्षणाचा विषय राहत होता.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राज्यातील कैथल जिल्ह्यात येथील देशात प्रसिद्ध असलेल्या ‘सुलतान’ रेड्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुलतान हा देशातील सर्वच पशु मेळाव्यांमध्ये नेहमीच आकर्षणाचा विषय राहत होता. पशु मेळाव्यातील सर्वात मोठा मेळा समजल्या जाणाऱ्या राजस्थानातील पुष्कर मेळाव्यात सुलतानची बोली ही 21 कोटी रुपये लावण्यात आली होती. मात्र, मालकाने त्याला न विकण्याचा निर्णय घेतला होता.

सुलतानच्या खाण्यापिण्यासाठी दररोज 2500 रुपयांचा खर्च

कैथल येथील नरेश हे दुग्धव्यवसायाचा करतात. यासाठी त्यांच्याकडे म्हशीचा एक मोठा गोठा आहे. यात त्यांनी सुलतान नावाचा एक रेडाही पाळला होता. हा जवळपास 1200 किलो वजनाचा होता. त्याचे मालक नरेश हे सांगतात, तो आमच्या कुटुंबाचाच एक भाग होता. त्याच्या खाण्यापिण्यासाठी दररोज 2500 रुपयांचा खर्च येत असे मात्र तो आम्हाला वर्षाला कमीअधीक कोटी रुपयांचे मानधन मिळून देत असे. त्याच्या जाण्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. आम्ही त्याचे आयुष्यभर कर्ज फेडू शकणार नाही.

7 वेळा जिंकली बक्षिसे –

सुलतानने देशभरात झालेल्या मेळाव्यात अनेक बक्षिसे पटकवलेली आहेत. सुलतानने २०१३ साली राष्ट्रीय पशु सौंदर्य स्पर्धेत हिसार, झज्जर आणि कर्नाल येथून राष्ट्रीय विजेतेपदही पटकावले होते. तर विविध मेळाव्यांच्या कार्यक्रमामध्ये सुलतानला आतापर्यंत 7 बक्षिसे मिळालेली आहेत. नेहमीच सुलतान हा मेळाव्यात आकर्षणाचे केंद्र बनत होता.

असा होता सुलतानचा खुराक –

सुलतान हा उंचीला 6 फूट होता तर त्यांचे वजन हे 1200 किलो होते. त्याला आहारात 10 किलो खुराक, 10 लीटर दूध, 35 किलो हिरवा आणि सुकलेला चारा यासह त्याला सफरचंद आणि गाजर ही खायला दिल्या जात होते.

‘असे’ मिळवून देत होता उत्पन्न –

नरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान हा वर्षभरात जवळपास 30 हजार वीर्याचे डोस देत होता. जे 300 रुपये प्रति डोस प्रमाणे विकल्या जायचे. त्याच्याकडून आठवड्यातून दोन वेळा वीर्य घेतल्या जात असे. त्यानुसार सुलतानच्या वीर्याचेच नरेश यांना जवळपास 90 लाख रुपये मिळत असत. याव्यतिरिक्त तो विविध कार्यक्रमातही बक्षिसे मिळवत होता, असे नरेश यांनी सांगितले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram