पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कोषाध्यक्षपदी संदिप आढाव यांची निवड.
संदिप आढाव यांनी पूर्वी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या सहसचिव या पदाचा कार्यभार सांभाळला

पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कोषाध्यक्षपदी संदिप आढाव यांची निवड.
संदिप आढाव यांनी पूर्वी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या सहसचिव या पदाचा कार्यभार सांभाळला
बारामती वार्तापत्र
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार व मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेबजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य यांच्या विचार-विनिमयानुसार बारामती तालुका पत्रकार संघाचे पत्रकार संदीप आढाव यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सुनील लोणकर यांनी दिली.
संदिप आढाव यांनी पूर्वी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या सहसचिव या पदाचा कार्यभार सांभाळला आहे . तसेच पत्रकार संघटनेसह सी आर ग्रुप – सी आर सामाजिक संघटना, महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश सचिव, महात्मा फुले बहुजन महासंघाचे प्रदेश सचिव, महाराष्ट्र धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समितीचे प्रदेश प्रसिध्दीप्रमुख, महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्व भाषीक चे पुणे जिल्हा महासचिव, बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र राज्य चे पुणे जिल्हा सचिव इत्यादी पदांवर त्यांनी पदभार स्वीकारला आहे. आणि याचाच आढावा घेत त्यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पत्रकार संघटनेवर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून संदिप आढाव यांची निवड झाल्याने- बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगरीच्या विद्यमान नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अॅड.राजेंद्र काळे, भारतीय जनता पार्टी चे बारामती तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, नगरसेवक जयसिंग देशमुख, सी आर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष अॅड. हेमचंद्र मोरे, माळेगाव चे माजी सरपंच जयदीप तावरे, माजी सभापती संजय भोसले यासह बारामतीतील विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षातील प्रमुखांनी संदिप आढाव यांचे स्वागत करत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.