बारामती शहरात पोलीस आणि वकिल पुन्हा आमने सामने.. पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी वकिलांचा पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या
इतरही लोक विना मास्क जात असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही?

बारामती शहरात पोलीस आणि वकिल पुन्हा आमने सामने.. पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी वकिलांचा पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या
इतरही लोक विना मास्क जात असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही?
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातल्या भिगवण चौकात पोलिसांची वकिलाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ.. भाजलेल्या मुलाला दवाखान्यात घेऊन चाललेल्या एका वकीलाला शहरातील पोलिसांकडून वकीलावर कारवाई.. संबंधित पोलीस कर्मचा-या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी संतप्त वकिलांची पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या
या वकिलाने मास्क नसल्याने पावती देखील फाडली, परंतु आपल्यासमोर इतरही लोक विना मास्क जात असताना कारवाई होत नाही म्हणून विचारणा केली असता पोलिस कर्मचाऱ्याने धमकावले अशी तक्रार एका वकिलाने केली. या घटनेनंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी धमकावल्याची वकिलांची तक्रार होती, तर वकिलास मास्क नसल्याने पोलिसांनी कारवाई केली असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चौकटे यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शहरातील न्यायालयात वकिली करणाऱ्या येथील अतुल भोपळे या वकीलांच्या बाबतीत हा प्रकार घडला. या वकिलांच्या मुलाला भाजले असल्याने आपल्या मुलाला घेऊन तातडीने मोटारीतून दवाखान्यात निघालेल्या वकिलांना शहरातील भिगवण चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. विनामास्क असल्याने कारवाई करावी लागेल असे सांगितल्यानंतर वकिलाने पावती फाडली.
त्याच वेळी इतरही लोक विना मास्क जात असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही? अशी विचारणा संबंधित वकीलांनी केली. त्यावर अचानक एका वाहतूक पोलिसाने येऊन आपली गचांडी धरली व पोलीस वाहनात नेऊन बसवले अशी तक्रार या वकिलांनी केली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे वकीलांनी तक्रार केली आहे. असे सोकटे यांनी सांगितले.
दरम्यान वकिलांना गचांडी धरून धमकावल्याची माहिती मिळाल्यानंतर बारामती वकील संघटनेचे पदाधिकारी शहर पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचा आग्रह धरला. मात्र पोलीस त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिले.