माळेगाव बु

माळेगाव येथे शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी

दिपकबापू तावरे यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण

माळेगाव येथे शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी

दिपकबापू तावरे यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण

बारामती वार्तापत्र

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणांचे बलिदान देऊन हुतात्मा झालेल्या शहीद भगतसिंग यांची जयंती माळेगाव बुद्रुक, तालुका बारामती येथील खडकआळी येथे साजरी करण्यात आली. पंचायत समिती बारामती चे माजी सदस्य, माळेगाव कारखान्याचे माजी संचालक दिपकबापू तावरे यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

डॉ. प्रविण यादव यांनी शहीद भगतसिंग यांच्या कार्याचा गौरव करत तरुण पिढीने वीर भगतसिंग यांचा आदर्श देशाविषयी कायम अभिमान बाळगला पाहिजे व देशाचे नाव उंचावले पाहिजे असे सांगितले. यावेळी रेहमान शेख, प्रदिप जाधव, अनिल वाघमोडे, प्रा.अनिल तांबे, मनोज वाईकर, निता भुजबळ, अंजना वाघमारे, संदिप आढाव, चंद्रकांत दळवी, बाळासाहेब जाधव, आण्णा पवार, अनंता भिसे, महेश होले, राहुल दळवी, पप्पू माने, संपत रासकर, दादा जाधव, नितिन जाधव, तेजस भोसले सह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button