स्थानिक

चक्कर रस्त्यावरच आढळले मद्याचे १५ बॉक्स

निरा रस्त्यावरील शेराची वस्ती येथे मद्याचे बॉक्स आढळल्याने चर्चला उधाण .

चक्कर रस्त्यावरच आढळले मद्याचे १५ बॉक्स

निरा रस्त्यावरील शेराची वस्ती येथे मद्याचे बॉक्स आढळल्याने चर्चला उधाण .

बारामती वार्तापत्र 

मोरगाव- निरा रस्त्यावरील शेराचीवस्ती येथे रस्त्याच्या बाजुला आज (दि:१) रोजी मद्याचे बॉक्स आढळुन आले .याबाबत वडगांव निंबाळकर पोलीसांनी मुद्देमालाची तपासणी केली असता सदर ठिकाणी पंधरा मद्याच्या बॉक्समध्ये ऑफीसर चॉईस मद्याच्या काही बाटल्या आढळुन आल्या .

मोरगाव सातारा या रस्त्यावरील मोरगाव गावच्या हद्दीतील निरा रस्त्यावरील शेराची वस्ती येथे मद्याचे काही बॉक्स पडले असल्याची चर्चा मोरगाव सह परिसरात वाऱ्यासारखी फिरत होती . याबाबतची माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांना समजली त्यानंतर लगेचच मोरगाव पोलीस चौकीचे पोलीस हवलदार वसंत वाघले यांनी घटनास्थळी धाव घेतली व पडलेल्या बॉक्सची तपासणी केली .येथे १५ बॉक्स आढळून आले तर या बॉक्समध्ये ऑफिसर चॉईसच्या वीस बाटल्या आढळून आल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!