60 वर्ष कारखाना स्थापन होऊन उमेदवारी दिली नसल्याने सोमेश्वर कारखाना निवडणूक मतदानावर बहिष्कार?
गावामध्ये कोणी कारखाना निवडणूकीच्या प्रचारासाठी आले तर सहभागी होयचे नाही.

60 वर्ष कारखाना स्थापन होऊन उमेदवारी दिली नसल्याने सोमेश्वर कारखाना निवडणूक मतदानावर बहिष्कार?
गावामध्ये कोणी कारखाना निवडणूकीच्या प्रचारासाठी आले तर सहभागी होयचे नाही.
बारामती वार्तापत्र –प्रतिनिधी
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत कारखाना स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच कारखाना निवडणूकिमध्ये आख्य गावच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आहे.
60 वर्ष कारखाना स्थापन होऊन उलटून गेली तरी उमेदवारी दिली नसल्याने या वर्षी उमेदवारी मिळेल अशी खात्री होती.परंतु पुन्हा डावल्या गेल्याने जवळपास तीनशे गावातील ग्रामस्थ आणि युवकांनी एकत्र येत सोमेश्वर कारखाना निवडणूकित मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादी पक्षा कडून गावातील पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत बैठकीत पाच पैकी कोणत्याही एका उमेदवारांस उमेदवारी मागणीचे सह्यांची मोहीम घेऊन त्याचे निवेदन पक्ष श्रेष्टीकडे देण्यात आले होते.आणि मुलाखती दरम्यान उमेदवारानी एकत्र मागणी करताना पाच पैकी कोणत्याही एकाला
उमेदवारी द्यावी असे म्हणणे पक्ष श्रेष्टीकडे मांडले होते.
परंतु उमेदवारी मिळणार अशी खात्री कारखाना परिसरात असताना उमेदवार यादी प्रसिद्ध होताच यादीत नावे न आल्याने वाघळवाडी गावास संचालक पदापासून पुन्हा दूर ठेवण्यात आले. यादीमध्ये दोनशे ते तीनशे मतदान असलेल्या गावात एक तर दोन उमेदवार दिलेत.गावात जवळपास चारशे मतदार असतानाही एक सुध्दा उमेदवारी 60 वर्ष झाले तरी दिली नसल्याने गावातील सर्वानी तीव्र नाराजी व्यक्त करत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे आज पार पडलेल्या गाव बैठकीत निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी एक मुखाने घेतला.
गावामध्ये कोणी कारखाना निवडणूकीच्या प्रचारासाठी आले तर सहभागी होयचे नाही. अनुउपस्थिती दर्शवत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे सर्व ग्रामस्थांनी ठरविले आहे.