संजय गांधी निराधार अनुदान योजनेची २०७ प्रकरणे मंजूर
बारामती तालुक्यातील १०,३१७ लाभार्थ्यांना एकूण १ कोटी ८५ लाख ४८ हजार ९०० ही रक्कम आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सर्व लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा

संजय गांधी निराधार अनुदान योजनेची २०७ प्रकरणे मंजूर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते राष्ट्रीय कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थींना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप विद्या प्रतिष्ठान व्ही.आय.आय.टी. याठिकाणी वाटप करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
महात्मा गांधी जयंतीनिमित्त संजय गांधी अनुदान योजना समितीची संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी निवड सभा आज गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वा. संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.सदर सभा सुनिल बनसोडे,शहाजी दळवी,लालासो होळकर,निलेश मदने,अशोक इंगवले,सदस्या नुसरत इनामदार तसेच तहसीलदार विजय पाटील नायब तहसीलदार महादेव भोसले अव्वल कारकून सुरेश जराड,लिपिक स्वप्निल जाधव, मदतनीस तृप्ती घोडके आदींच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी संजय गांधी योजनेची १४१ प्रकरणे सादर करण्यात आली होती. त्यातील १३८ प्रकरणे मंजूर करण्यात आली व ३ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. श्रावणबाळ योजना अंतर्गत ६७ प्रकरणे सादर करण्यात आली होती. यातील ५९ प्रकरणे मंजूर करण्यात आली व ८ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी योजना ७ प्रकरणे सादर करण्यात आली होती ती सर्व ७ ही प्रकरणे मंजूर करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब योजनेची ३ प्रकरणे सादर करण्यात आली होती ती ३ ही प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
बारामती तालुक्यातील १०,३१७ लाभार्थ्यांना एकूण १ कोटी ८५ लाख ४८ हजार ९०० ही रक्कम आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सर्व लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व प्रमुख गावांमध्ये संजय गांधी योजनेचे कॅम्प घेऊन गरजू लाभार्थींना सदर योजनेचा अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा असे आवाहन एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले.