केंद्र सरकार विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा इंदापूर बंद चा निर्धार
सोमवारी ठीकठिकाणी बंद पाळून केंद्र सरकारचा करणार निषेध व्यक्त

केंद्र सरकार विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा इंदापूर बंद चा निर्धार
सोमवारी ठीकठिकाणी बंद पाळून केंद्र सरकारचा करणार निषेध व्यक्त
इंदापूर : प्रतिनिधी
केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या मागण्यांची कोणतीही दखल सरकारने न घेता उलट उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने स्वतःच्या गाडीखाली क्रूर पध्दतीने चिरडून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे.म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,शिवसेना व इतर घटक पक्ष सोमवारी ( दि.११ ) इंदापूर तालुक्यात ठीकठिकाणी बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणार आहेत.अशी माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोदी सरकारच्या काळामध्ये लोकशाही पद्धतीने न्याय मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी बांधवांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी (दि.११) भारत बंदची हाक दिली आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, शिवसेना तालुका प्रमुख नितीन शिंदे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, काका देवकर,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महादेव सोमवंशी, चमनभाई बागवान, उमा इंगोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.