क्राईम रिपोर्ट

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी रवानगी

न्यायालयाने रिमांड कालावधीत काही अटीही घातल्या आहेत

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी रवानगी

न्यायालयाने रिमांड कालावधीत काही अटीही घातल्या आहेत

क्राईम; बारामती वार्तापत्र

लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला  न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी  सुनावली आहे. दरम्यान, विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने आशिष मिश्राची 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आशिष मिश्राची पोलीस कोठडीत रवानगी करताना न्यायालयानं काही अटीही ठेवल्या आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये विशेष तपास पथकानं 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना शनिवारी अटक केली होती. त्यापूर्वी आशिष मिश्रा यांची 12 तास चौकशी करण्यात आली. आशिष मिश्राच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी न्यायालयात कोठडी वाढवून देण्याची याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली.

आशिष मिश्राच्या वकिलांचा एसआयटीला सवाल

सुनावणी दरम्यान, आशिष मिश्राच्या वकिलाने न्यायालयात पोलिसांना सांगितले, जर तुमच्याकडे प्रश्नांची अधिक यादी असेल तर दाखवा, आशिषने तपास अधिकाऱ्यापुढे कलम 161 अन्वये आधीच जबाब नोंदवला आहे. असं असलं तरी, पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आशिषने तपासात सहकार्य केलं नाही. मिश्राचे वकील अवधेश म्हणाले की, एसआयटीनं सांगावं की त्याला कोठडी का हवी आहे, त्यांना आशिषला कुठे घेऊन जायचं आहे?

या प्रकरणात मिश्राचा बचाव करताना वकील म्हणाले की तुम्ही आम्हाला 40 प्रश्नांची प्रश्नावली दिली होती. पण तुम्ही हजारो प्रश्न विचारलेत, आता काय विचारायचे उरले आहे? त्याचवेळी, न्यायालयात सुनावणीदरम्यान एसआयटीने आशिष मिश्राची 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. न्यायालयाने रिमांड कालावधीत काही अटीही घातल्या आहेत. पहिली अट अशी आहे की, आशिष मिश्राचे मेडिकल केले जाईल. चौकशी दरम्यान त्याला बळजबरी केली जाणार नाही आणि या दरम्यान त्याचे वकील उपस्थित राहतील.

Related Articles

Back to top button