राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दणदणीत विजय
या निवडणुकीत भाजपच्या पॅनलला १० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत.
राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दणदणीत विजय
या निवडणुकीत भाजपच्या पॅनलला १० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत.
बारामती वार्तापत्र
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने जोरदार मुसंडी मारली आहे. पहिल्या दोन गटांपाठोपाठ तिसऱ्या आणि चौथ्या गटातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु असलेले कल कायम राहिले असून सध्या शेवटचा कला हाती आला, तेव्हा गटांमधील मतमोजणी पूर्ण झाली होती. पाचवा गट मतमोजणीला घेण्यात आला असून, पाच गटातील तीन उमेदवारांसह महिला प्रवर्गातील दोन महिला उमेदवारांच्या मतांची मोजणी होणार आहे.
गट क्रमांक एक मधून जितेंद्र नारायण निगडे, लक्ष्मण गंगाराम गोफणे, अभिजीत सतीशराव काकडे हे विजयी झाले असून मुरूम वाल्हा या गटातून विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम रामराजे जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिवाजीराव शिंदे व ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड हेसुद्धा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.
होळ – मोरगाव गटातून आनंदकुमार शांताराम होळकर, शिवाजी राजे द्वारकोजीराव राजे निंबाळकर व किसन दिनकर तांबे आणि कोऱ्हाळे – सुपा गटातून माजी उपाध्यक्ष सुनील नारायण भगत, रणजीत नंदकुमार मोरे व हरिभाऊ महादेव भोंडवे हे विजयी झाले आहेत.
आतापर्यंत चार गटांचे निकाल हाती आले असून त्यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.
होळ-मोरगाव या तिसऱ्या गटामध्ये सोमेश्वर विकास पॅनलच्या आनंदकुमार होळकर (१७८८८), किसन तांबे (१८०५९), शिवाजीराजे निंबाळकर (१८०३०) आणि कोऱ्हाळे- सुपा गट क्र. ४ मधून सुनील भगत (१८१४४), हरीभाऊ भोंडवे (१७७५१), रणजित मोरे (१७३४१) यांनी विजय मिळवला आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत भाजपच्या पॅनलला १० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत.प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या सूचनेनुसार सध्या पाचवा गट मतमोजणीसाठी घेण्यात आला असून ,महिला प्रवर्गातील दोन उमेदवारांचीही मतमोजणी आता होणार आहे. संपूर्ण कल हाती येण्यास रात्री उशिरापर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.