विजयादशमी-दसऱ्याच्या मुहूर्तावर इंदापूरमध्ये झेंडू खरेदीसाठी झुंबड
झेंडूला ४० ते ८० रुपयांचा दर
विजयादशमी-दसऱ्याच्या मुहूर्तावर इंदापूरमध्ये झेंडू खरेदीसाठी झुंबड
झेंडूला ४० ते ८० रुपयांचा दर
इंदापूर : प्रतिनिधी
विजयादशमी,दसरा आणि झेंडूची फुले यांचे समीकरण असल्यामुळे दसरा सणासाठी इंदापूर शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यावर पिवळ्या,केशरी झेंडूसह शेवंतीच्या फुलांच्या राशी पडल्या आहेत.गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झेंडूने ३०० ते ४०० रुपये प्रति किलो भाव खालला होता.मात्र यंदा मुबलक प्रमाणात झालेला पाऊस आणि कोरोनाचे काही प्रमाणात शिथिल झालेले निर्बंध पाहता बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक आल्याने ४० ते ८० रुपये प्रति किलोला भाव मिळत आहे.
दरम्यान बारामती वार्तापत्रशी बोलताना शेतकरी ज्ञानेश्वर बबन कोळेकर ( मौजे,सरडेवाडी ता.इंदापूर ) म्हणाले की, गेल्यावर्षी झेंडू चा भाव दोनशे ते चारशे रुपये प्रति किलो होता. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने झेंडू विजयादशमी-दसऱ्याच्या मुहूर्तावर ४० ते ६० रुपये प्रति किलोने विकला जात आहे.गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे देखील झेंडूची नासाडी झाली असून शेतकऱ्याचा खर्चसुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती आहे.
विजयादशमी,दसरा आणि झेंडूची फुले यांचे समीकरण असल्यामुळे इंदापूर बाजारपेठत झेंडू खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र गुरुवारी ( दि.१४ ) पहावयास मिळाले. पूजेचा मान असलेला गोंडा (झेंडू), तोरणासाठीची आंबा-अशोकाची पाने, आपट्याची पाने आदी पाना फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे.