पोलिसांच्या तत्परतेने मुलगी व आई वडिलांची भेट
ओळख पटल्याने मुलीस पालकांच्या ताब्यात देण्यात आले
पोलिसांच्या तत्परतेने मुलगी व आई वडिलांची भेट
ओळख पटल्याने मुलीस पालकांच्या ताब्यात देण्यात आले
बारामती वार्तापत्र
बारामती: सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांच्या कार्य तत्परतेने हरवलेली मुलगी व आई वडील यांची भेट झाल्याची घटना बारामती शहरात घडली.
गुरुवार दि 14 ऑक्टोबर रोजी मारवाठ पेठ येथे लहान मुलगी आई वडिलांच्या शोध घेत रडत असताना पोलीस नाईक महेश भोंगळे याना आढळून आली भोंगळे यांनी परिस्थिचे गांभिर्य पाहून सदर मुलीस शहर पोलीस स्टेशन येथे आणले
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मुलीचा फोटो काढून शहरातील व्हाट्सउप ग्रुप वर टाकण्यात आला व मुलगी सापडली आहे त्वरित पालकांनी संपर्क करण्याचे आव्हान केले
काही तासानंतर मुलीचे वडील चारुदत्त रवींद्र पेंढारकर वय वर्ष 41 राहणार खाटीक गल्ली यांनी सदर फोटो पाहून पोलीस स्टेशन मध्ये आले व त्यांनी सदर मुलीचे नाव अवनी असून ओळख सांगितली व शेवटी ओळख पटल्याने मुलीस पालकांच्या ताब्यात देण्यात आले