साताऱ्यात एका मातेने आपल्या पोटच्या लेकरुला बस स्टँडवर एकटं सोडल्याची धक्कादायक घटना
पोलीस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.
साताऱ्यात एका मातेने आपल्या पोटच्या लेकरुला बस स्टँडवर एकटं सोडल्याची धक्कादायक घटना
पोलीस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.
सातारा : प्रतिनिधी
एका मातेने आपल्या पोटच्या लेकरुला बस स्टँडवर एकटं सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या दीड वर्षाच्या लेकरुला बस स्टँड परिसरात एकटं सोडून जाताना जन्मदात्रीला काहीच कसं वाटलं नसेल? असा सवाल शहरातील नागरिकांना सतावतोय. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
सातारा एसटी स्टँडमधील पार्सल विभाग शेजारील पोर्चमध्ये एका दीड वर्षाच्या बालकास एकट्याला सोडून अज्ञात महिला परागंदा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या बालकाला मातेने एकटेच का सोडलं असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान सातारा एसटी महामंडळाच्या वरिष्ठ आगार प्रमुखांनी त्या बालकाची रवानगी आपल्या कर्मचाऱ्यांसह सातारा शहर पोलीस ठाण्यात केली. सुमारे तीन तास त्या बालकाला सांभाळण्याचे दिव्य काम शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी पार पाडले.
सीसीटीव्हीत बाळ सोडून जाणारी महिला कैद
नंतर याबाबतची माहिती एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून घेतल्यानंतर त्या बालकाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून पुढील कारवाई पोलीस करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सातारा एसटी स्टँड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक महिला आणि तिच्यासोबत लहान मुलगी दिसत आहे. या महिलेच्या कडेवर दिसणार हे लहान मुल असून संबंधित महिलेचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. या दरम्यान परिसरातील एका महिलेने बाळाच्या आई-वडिलांचा तपास लागत नाही तोपर्यंत जबाबदारी स्वीकारली आहे. ती महिला सध्या बाळाचं पालनपोषण करत आहे.