राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं निवडणूक कार्यक्रम केला जाहीर केला असून 5 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं निवडणूक कार्यक्रम केला जाहीर केला असून 5 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार
मुंबई :प्रतिनिधी
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं निवडणूक कार्यक्रम केला जाहीर केला असून 5 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. राज्यातील एकूण 264 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत.
दोन टप्प्यात निवडणूक, 5 फेब्रुवारीला मतदान
मागील दीड वर्षापासून कोरोनाचे सावड कायम असल्यामुळे वेगवेगळ्या निवडणुका लांबल्या. सध्या मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याच कारणामुळे आता वेगवेगळ्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येत आहे. सध्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार राज्यात 264 बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार असून येत्या 5 फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
मतदार याद्या तयार करून देण्याची सूचना
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आदेशानंतर आजपासून (22 ऑक्टोबर) मतदार याद्या तयार करून सहकारी निवडणूक प्राधिकरणाला देण्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.