माळेगाव गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप तावरे यांची सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
आता पोलीस काय करणार?
माळेगाव गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप तावरे यांची सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
आता पोलीस काय करणार?
बारामती वार्तापत्र
३१ मे रोजी रविराज तावरे यांच्यावर माळेगाव (ता. बारामती) येथे गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत पोपटराव मोरे, टॉम उर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव व एका अल्पवयीनावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती.
रविराज तावरे यांनी रुग्णालयात उपचार घेताना दिलेल्या जबाबावरून या प्रकरणी पोलिसांनी जयदीप तावरे यांच्यावरही कटात सहभागी
असल्याचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. मोक्कांतर्गत त्यांच्यावरही कारवाई झाली होती. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी कलम १६९ अंतर्गत अहवाल सादर करून जयदीप यांचा या गोळीबार प्रकरणात सहभाग नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने तावरे यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, १६ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत मोक्का न्यायालयाने शिरगावकर यांचा अहवाल फेटाळून तावरे यांना दि. १८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.
दरम्यान, याबाबत तावरे यांनी उच्च न्यायालयातधावघेत अपील केले होते.उच्च न्यायालयाने मोक्का न्यायालयाचाच निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या जयदीप तावरे यांना तिथेही दिलासा मिळालेला नाही.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रविराज तावरे यांच्या वतीने एडवोकेट गीत रंजन अहुजा व ज्येष्ठ कायदेतज्ञ बसावा प्रभू पाटील यांनी बाजू मांडली. न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठापुढे मांडण्यात आली होती. 25 ऑक्टोबर रोजी ही याचिका खंडपीठापुढे मांडण्यात आली होती.