काकूबाईंचा ‘बाला ओ बाला’ गाण्यावर देशी डान्स
या काकूबाईकडून डान्सचे धडे घ्यायला पाहिजे.

काकूबाईंचा ‘बाला ओ बाला’ गाण्यावर देशी डान्स
या काकूबाईकडून डान्सचे धडे घ्यायला पाहिजे.
प्रतिनिधी
भारतीय लग्नांमध्ये नाचणं आणि गाणं हा जणू एक अविभाज्य भागच आहे. लग्न हा एक असा कार्यक्रम आहे ज्यात लोक सर्व रुसवे फुगवे विसरून एकत्र येतात आणि आनंद साजरा करता. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
https://youtube.com/shorts/V3S6oSrZFBA?feature=share
37 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बॅकग्राऊंडमध्ये डीजे वाजत आहे. व्हिडिओमध्ये एक काकूबाई आपल्या देशी डान्स स्टेपनं सर्वांचं मन जिंकत आहेत. या काकूबाईंचा डान्स पाहून आसपास उपस्थित असलेले लोकही भरपूर हसतात आणि टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह आणखी वाढवतात.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गाणं ऐकताच एक काकूबाई मैदानात येतात. आधी त्या नागिन सॉन्गवर मजेशीर डान्स करतात आणि यानंतरच्या गाण्यावर त्या असा डान्स करतात की आसपास बसलेले सगळेच हसू लागतात.