प्रदूषण कमी कण्याचे उदिष्ट, इलेक्ट्रिक वाहनांची किंमती होणार कमी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू

प्रदूषण कमी कण्याचे उदिष्ट, इलेक्ट्रिक वाहनांची किंमती होणार कमी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू
प्रतिनिधी
आता सरकारने इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादन खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहने देखील पेट्रोल, डिझेलवर चाणाऱ्या वाहनांच्या किमतीमध्ये उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते सस्टेनेबिलिटी फाउंडेशनच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते.
इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. ‘फेम’ योजनेंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर सबसीडी दिली जात आहे. मात्र तरी देखील या वाहनांची किंमत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा कमी असल्याचे दिसून येत आहे.
प्रदूषण कमी कण्याचे उदिष्ट
यावेळी बोलताना गडकरी यांनी म्हटले आहे की ज्या लोकांना इलेक्ट्रिक वाहना खरेदीची इच्छा आहे, मात्र जादा किमतीमुळे खरेदी करू शकत नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची किंमत आणखी कमी होणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवून प्रदूषणाला आळा घालण्याचे सरकारचे धोरण आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर सुरुवातीपासून केवळ 5 टक्केच जीएसटी आकारला जातो. आणि आता लिथियम बॅटरीचा निर्मिती खर्च कशापद्धतीने कमी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोल पंपांना यापूर्वीच चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येत्या वर्षभरात संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन निर्माण होतील.
लिथियम बॅटरीची किंमत कमी होणार
सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा महत्त्वाचा पार्ट असणाऱ्या लिथियम बॅटरीचा निर्मिती खर्च अधिक आहे, तो कशापद्धतीने कमी करता येईल यावर काम सुरू आहे. स्थानिक लेव्हरवर जास्तीत जास्त बॅटरीचे उत्पादन व्हावे यासाठी प्रोहत्साहन देण्यात येत आहे. भारत सरकारकडून एक योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गंत 2030 पर्यंत भारतातील एकूण वाहन संख्येपैकी 30 टक्के खासगी वाहने, 70 टक्के व्यवसायीक वाहने, तर 40 टक्के बस या इलेक्ट्रिक करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
चार्जिंग पॉइंट उभारण्यासाठी परवानगी
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी मोठ्या प्रमाणात चार्जिंग पॉइंटची आवश्यकता असणार आहे, हे लक्षात घेऊन देशात चार्जिंग पॉइंट उभारण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. पेट्रोल पंपांना चार्जिंग पॉइंट उभारण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. इलेट्रिक वाहनांची संख्या वाढल्यास देशातील प्रदूषणाचा स्थर निश्चितपणे कमी होईल असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.