स्थानिक

कालपासून बारामतीची एकही लालपरी रस्त्यावर नाही ;संपामुळे प्रवाशांमध्ये नाराजी

बारामती व एमआयडीसी आगारात जवळपास १२० बसेस असून २५० चालक व २२० वाहक आहेत.

कालपासून बारामतीची एकही लालपरी रस्त्यावर नाही ;संपामुळे प्रवाशांमध्ये नाराजी

बारामती व एमआयडीसी आगारात जवळपास १२० बसेस असून २५० चालक व २२० वाहक आहेत.

बारामती वार्तापत्र

कालपासूनच बारामती आगारातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बारामती आगारातून एकही लालपरी रस्त्यावर दिसली नाही. बारामती व एमआयडीसी आगारात जवळपास १२० बसेस असून २५० चालक व २२० वाहक आहेत. या माध्यमातून बारामती आगार दररोज १२ हजारांहून अधिक प्रवाशांची राज्यभरात ने-आण करत असते.

राज्यभरातील राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी मंडळाच्या चालक, वाहक, यांत्रिक, परिवेक्षक आदी कर्मचाऱ्यांनी मागील सुमारे दोन आठवड्यापासून संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यभरात सुरू असलेल्या या संपामध्ये बारामती आगार, विभागीय कार्यशाळा बारामती व एमआयडीसी आगार या तिन्ही विभागाने पाठिंबा दर्शविला असून संपात सहभागी झाले आहेत.

कालपासूनच बारामती आगारातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बारामती आगारातून एकही लालपरी रस्त्यावर दिसली नाही. बारामती व एमआयडीसी आगारात जवळपास १२० बसेस असून २५० चालक व २२० वाहक आहेत. या माध्यमातून बारामती आगार दररोज १२ हजारांहून अधिक प्रवाशांची राज्यभरात ने-आण करत असते. सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास म्हणून लालपरीकडे पाहिले जाते. मात्र कालपासून तिची चाके स्तब्द झाल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे.

दिवाळीसाठी पुण्याहून बारामतीला आले होते. सन साजरा करुन पुण्याकडे घरी जायचे आहे. मात्र दोन दिवसांपासून एसटी बंद असल्यामुळे मी माझ्या लहान मुलासह येथे अडकून पडली आहे. आई आजारी आहे तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे. मात्र बस बंद असल्याने माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. खाजगी वाहनाचे प्रवास भाडे परवडत नाही. त्यामुळे लवकरात लवकर एसटी सुरू करण्यात यावी..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram