बारामती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर
डिसेंबरमध्ये होणार निवडणूक
बारामती वार्तापत्र
जसजसे कोरोना चे सावट कमी होऊ लागले तस तसे सहकार क्षेत्रातील निवडणुकांना गती येऊ लागले आहे यामध्ये सध्या दि.बारामती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टाकसाळे यांनी केली आहे.
राज्यातील बहुतांश सहकारी संस्थांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागल्याने राज्यातील विविध संस्थांच्या निवडणुका जाहीर होवू लागल्या आहेत. त्यानुसार आज बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
बँकेने आपले कार्यक्षेत्र विस्तारले.
आजमितीस बँकेच्या सहा जिल्ह्यात तब्बल 36 शाखा आहेत. बँकेने आधुनिकीकरणाची कास धरल्याने बँकेची प्रगतीही वेगाने सुरु आहे. अनेक व्यावसायिकांसह लघुउद्योजकांनाही बँकेने अर्थसहाय्य करुन त्यांच्या व्यवसायाच्या उभारणीत मदत केली आहे.
असा असेल एकूण निवडणुकीचा कार्यक्रम….
• 15 ते 22 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावाधी
• 23 नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी
• 24 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची यादी प्रसिध्दी
• 8 डिसेंबर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारिख
• 9 डिसेंबर चिन्ह वाटप
• 19 डिसेंबर रोजी मतदान
• 21 डिसेंबर रोजी मतमोजणी.
बारामती सहकारी बँक दृष्टीक्षेपात….
• सहा जिल्ह्यात तब्बल 36 शाखा
• 2260 कोटी रुपयांच्या ठेवी
• 1525 कोटी रुपयांचे कर्ज वाटप
• 16456 सभासद संख्या
• 38 कोटी रुपयांचे भाग भांडवल
बारामती सहकारी बँक निवडणूक कार्यक्रम प्रोग्रम