माळेगांव नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर
८ पुरुष व ९ महिलांना काम करण्याची संधी मिळणार आहे
माळेगांव नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर
८ पुरुष व ९ महिलांना काम करण्याची संधी मिळणार आहे
बारामती वार्तापत्र
नगर पंचायत माळेगावच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत व प्रभाग रचना प्रारुप आराखडा प्रसिध्दी करण्यात आला.वाॅर्ड रचनेचे प्रभागात रूपांतर करताना हक्काचे मतदार प्रभागातून वगळल्याने अनेक इच्छुक नाराज झाले असून प्रथम नगर सेवक बनण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.
तालुक्यातील पहिली नगरपंचायत असलेल्या माळेगाव नगर पंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आलेल्या सुचनेनुसार नगर पंचायत कार्यालय येथे पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत व प्रभाग रचना प्रारुप आराखडा प्रसिध्दी करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे, माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य संजय भोसले,माजी सरपंच जयदीप तावरे, माजी उपसरपंच अजित तांबोळी,धनवान वदक, अशोक सस्ते, संदिप बुरुंगले, चंद्रकांत वाघमोडे, आऊराजे भोसले,उदय चावरे, प्रताप सातपुते, निशिगंध तावरे, फिरोज पठाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
नगर पंचायतीच्या १७ जागेसाठी आरक्षण सोडत झाली.यामधे ९ महिला व ८ पुरुष आहेत.१ अनुसूचित जाती महिला,३ ना.मा.प्र.महीला , ५ सर्वसाधारण महिला तर १ अनुसूचित जाती पुरुष,२ ना.मा.प्र.पुरूष व ५ सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण आहे.
आरक्षण सोडत पुढिल प्रमाणे-
प्रभाग १- ना.मा.प्र.महिला, (१३१०), रचना- उत्तर दगडी खाण, पुर्व सलोबाचा ओढा, दक्षिण नंदन डेअरी-पाणी फिल्चर रस्ता, पश्चिम पणदरे व सोनकसवाडी ग्रामपंचायत हद्द.
प्रभाग २- सर्वसाधारण, (१३३०), रचना- उत्तर खूंटाळेवस्ती, पुर्व जाधवराव राजवाडा रोड, दक्षिण क्रीडा संकूल संरक्षण भिंत, प्रश्चिम मुथा पेट्रोल पंप.
प्रभाग ३- सर्वसाधारण, (१२८२),रचना- उत्तर माळेगाव खुर्द हद्द ओढा, पुर्व निरा-बारामती रोड स्मशानभूमी, दक्षिण एसएसएम हायस्कूल मागिल बाजू, पश्चिम क्रीडा संकूल कंपाऊंड.
प्रभाग ४ – ना.मा.प्र.महिला, (१११२),रचना- नीरा बारामती रोड, पुर्व झैलसिंग रोड, दक्षिण दत्त चौक-पालखी मार्ग, पश्चिम मेनपेठ रोड.
प्रभाग ५ – सर्वसाधारण महिला, (१३६८), रचना- उत्तर एसएसएम हायस्कूल, पुर्व माधवानंद टाॅकीज समोरून जाणारा रस्ता, दक्षिण न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल, प्रश्चिम प्राथमिक आरोग्य केंद्र.
प्रभाग ६ – अनुसूचित जाती पुरुष, (१२५०), उत्तर दत्त चौक पालखी मार्ग, पुर्व झेलसिंग रोड, दक्षिण २२ फटा, पश्चिम न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल.
प्रभाग ७ – अनुसूचित जाती महिला, (१२००), रचना- उत्तर हरिभाऊ तावरे वस्ती, पुर्व एरिगेशन चारी, दक्षिण संभाजीनगर गायकवाड वस्ती रस्ता, पश्चिम पिर दर्गा.
प्रभाग ८- सर्वसाधारण महिला,(११२५),रचना-उत्तर नीरा-बारामती रोड, पुर्व बारामती-माळेगाव शिव,दक्षिण लाखे गोठा, पश्चिम झैलसिंग रोड.
प्रभाग ९ – ना.मा.प्र. (११२९), रचना- उत्तर संभाजीनगर गायकवाड वस्ती रस्ता, पुर्व शारदानगर आंदोबावाडी रोड, दक्षिण पाहुणेवाडी रस्ता, पश्चिम शिरवली रोड.
प्रभाग १०- सर्वसाधारण महिला, (११९०),रचना- उत्तर न्यू इंग्लिश मेडीय़म स्कूल, पुर्व २२ फाटा, दक्षिण-शारदाबाई पवार विद्यालय, पश्चिम एरिगेशन चारी.
प्रभाग ११- सर्वसाधारण महिला, (१२०५),रचना- उत्तर नंदन डेअरी, पुर्व-दफण भूमी, दक्षिण २२ फाटा, पश्चिम नागतळे.
प्रभाग १२- सर्वसाधारण,(१३५३),सर्वसाधारण (१३५३), रचना-उत्तर दगडी खाण, पुर्व इंजिनिअरिंग काॅलेज शेजारील खाणीकडे जाणारा रस्ता, दक्षिण रमा माता नगर, पश्चिम पणदरे-माळेगाव रस्ता.
प्रभाग १३- सर्वसाधारण, (१२५०), रचना- उत्तर रमामाता नगर, पुर्व नागतळे, दक्षिण गोफणेवस्ती, पश्चिम पणदरे माळेगाव शिव. प्रभाग
प्रभाग १४- ना.मा.प्र.महिला, (१३५०), रचना- उत्तर २२ फाटा, पुर्व माळेगाव शिरवली रोड, दक्षिण बर्गे हाॅस्पीलट ते तावरेवस्ती रस्ता, पश्चिम लोणकरवस्ती.
प्रभाग १५- ना.मा.प्र. ( १२८६), रचना-उत्तर बर्गे हाॅस्पीटल ते तावरेवस्ती रस्ता, पुर्व २२ फटा, दक्षिण-बुरूंगलेवस्ती प्राथमिक शाळा, प्रश्चिम माळेगाव शिरवली रोड.
प्रभाग १६- सर्वसाधारण, (१३२०),रचना- उत्तर वाघमोडे कोळेकरवस्ती रस्ता, पुर्व येळेवस्ती रस्ता, दक्षिण येळे वस्ती, पश्चिम नाळे-नलवडेवस्ती.
प्रभाग १७- सर्वसाधारण महिला,(१३९७), रचना-उत्तर गोफणेवस्ती, पुर्व माळेगाव शिरवली रोड, दक्षिण शिरवली शिव, पश्चिम धुमाळवाडी शिव.
हारकत व सुनावणीचे वेळापत्रक
माळेगाव नगरपंचायतीची लोकसंख्या २१ हजार २८४ इतकी आहे. त्यानुसार या नगरपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने जाहिर झालेली प्रभागनिहाय आरक्षण सोडत व प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्याबाबत हारकती व सूचनांसाठी १६ नोव्हेंबर पर्यंत कालावधी दिला आहे, तर त्यावर १७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून २३ नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय जाहिर केला जाणार आहे.