स्व. बाजीराव पाटील यानी वारणा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागगतील बहुजनांच्या शिक्षणाचे दरवाजे खुले केले:ना.जयंत पाटील
"कोकण गुरुकुल"च्या माध्यमातून मोफत निवासी शिक्षणाची सुविधा करण्यात आली आहे.
स्व. बाजीराव पाटील यानी वारणा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागगतील बहुजनांच्या शिक्षणाचे दरवाजे खुले केले:ना.जयंत पाटील
“कोकण गुरुकुल”च्या माध्यमातून मोफत निवासी शिक्षणाची सुविधा करण्यात आली आहे.
इसलामपूर ; (प्रतिनिधी)
इकबाल पीरज़ादे
सहकारातील ज्येष्ठ मार्गदर्शक साहित्यप्राज्ञ स्व. बाजीराव बाळाजी पाटील यांनी श्री.वारणा शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दरवाजे खुली करून आज वारणा शिक्षण संस्था आणि संस्थेचे शिवराज विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करीत असून यानिमित्ताने संस्थेच्या कार्यक्रमासाठी मला बोलवले याचा मला खुप अभिनंदन वाटतो असे मत महाराष्ट्र राज्याचे पालक मंत्री मा. जयंतरावजी पाटील यांनी वारणा शिक्षण संस्था सुवर्णं महॊत्सव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सिक्कीम चे माजी राज्यपाल व विद्यामान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपले मत व्यक्त केले ते म्हणाले डॉ. प्रताप पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीत अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले. शैक्षणिक नावीन्याचा ध्यास, प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रभावी अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या आधारावर संस्थेची वाटचाल सुरू केली असून बालवयातच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा व संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी आदर्श बालक मंदिर प्राथमिक विद्यालय, गोजाई शिशुविहार ची स्थापना डॉ. प्रताप पाटील यांनी केली असून .
शिराळा विधान सभा मतदार संघ चे विद्यामान आमदार मानसिगभाऊ नाईक यांनी आपले मत व्यक्त करताना असे म्हणाले की,मा.विनामूल्य शिक्षण व विनामूल्य भोजन हे सूत्र ठेवत संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तसेच वंचित, गरजू, गरीब विद्यार्थ्यांसाठी राजापूर तालुक्यातील तळगाव येथे “कोकण गुरुकुल”च्या माध्यमातून मोफत निवासी शिक्षणाची सुविधा करण्यात आली आहे.ही खरोखरच एक अभिमानस्पद गोष्ट आहे. असे गौरवऊगार काढले.
या कार्यक्रमांप्रसगी मा.आमदार विनय रावजी कोरे म्हणाले,दहावी-बारावीनंतर अल्पवयातच मुलींची होणारी लग्ने अथवा रोजगार शोधणाऱ्या मुला-मुलींसाठी उच्चशिक्षणाची सोय केल्यामुळे ऐतवडे खुर्द परिसरातील पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे असे प्रतिपादन त्यांनी केले.
या प्रसंगी बोलताना मा डॉ. कोरे पुढे म्हणाले,पन्नास वर्षातील सुवर्णमय वाटचालीत संस्थेने विविध स्थित्यंतरे अनुभवली असून भविष्यातील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी वारणा संकुल डॉ. प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्या उमेदीने व मार्गदर्शनामुळे पुढे वाटचाल करत आहे.
या कार्यक्रमासाठी वारणा बँक अध्यक्ष मा. निपुण कोरे, वारणा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, राजारामबापू पाटील अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, वारणा दूध संघ संचालक अभिजित पाटील,वारणा दूध संघ संचालक व्ही. टी. पाटील, वारणा दूध संचालक प्रदीप देशमुख,वारणा दुध संघ माजी संचालक केरू आबा पाटील,वारणा साखर कारखाना संचालक किशोर बापू पाटील, राजाराम बापू पाटील साखर कारखाना संचालक दिलीपराव पाटील, मा.जय प्रताप पाटील,माजी संचालक श्रीनिवास डोईजड,वारणा शिक्षण संस्था उपाध्यक्ष ईलाइ मुल्ला,. विश्वास्त बाबासो खराडे, बाबासो पाटील, जगन्नाथ पाटील, नामदेव परीट, अमरदीप कोरेगावकर, बाबासो सावर्डेकर,, सौ. शोभा धारवट,बबन पवार,सौ. डॉ. प्रज्ञा पाटील,सयाजी पाटील, मा. संदीप जाधव मा. बी. के. पाटील. आदी मान्यवर उपस्थीत होते. या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुवर्णा आवटे. सौ. बी डी. पाटील तर आभार डॉ. सुरज चौगुले,यांनी केले.