शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दीनानाथ रुग्णालयात दाखल ,प्रकृती चिंताजनक
डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत असून ते उपचारांना साथ देत नसल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दीनानाथ रुग्णालयात दाखल ,प्रकृती चिंताजनक
डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत असून ते उपचारांना साथ देत नसल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
प्रतिनिधी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यामुळे त्यांना कोथरुडच्या दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे बाबासाहेब पुरंदरेंचे मुलगे अमृत पुरंदरे यांनी सांगितले. बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता.
सार्वजनिक कार्यक्रमांना जाणंही बंद
काही महिन्यांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यावेळी झालेल्या दोन ते तीन कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घरी येऊन पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. दोन ती कार्यक्रम वगळता त्यांनी नंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. दिवाळी निमित्त होणाऱ्या शस्त्र पूजन कार्यक्रमालाही ते हजर राहिले नव्हते. पहिल्यांदाच ते या कार्यक्रमाल हजर राहिले नव्हते.