चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणले, अजित दादांच्या या वक्तव्याची दखल घेत बारामतीत अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा
बारामतीत पोलिसांची कारवाई; अवैद्य धंदे कराल तर याद राखा उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे

चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणले, अजित दादांच्या या वक्तव्याची दखल घेत बारामतीत अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा
बारामतीत पोलिसांची कारवाई; अवैद्य धंदे कराल तर याद राखा उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे
बारामती वार्तापत्र
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी परिचित असलेला राजकीय नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार ओळखले जातात. कामात कूचराई करणाऱ्यांची ते गय करत नाहीत. पुढचा मागचा विचार न करता थेट कान उघडणी ते करतात. बारामतीतील एका कार्यक्रमातील जाहीर सभेत त्यांनी ” तुम्ही चांगले DYSP म्हणून बारामतीत आणले.” या शब्दात अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती.
बारामतीच्या कुठल्याही भागात चालणारे दोन नंबरचे धंदे, बेकायदेशीर दारूविक्री, हातभट्टी कायमची बंद करा, जी कारवाई करायची असेल ती करा. असे सांगत अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या याची दखल घेऊन.
बारामतीत आज सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने शहराच्या विविध भागात कारवाईचा बडगा उगारला त्यामध्ये शहरातील माळावरची देवी, रिंग रोड, नीरा डावा कालवा, आमराई आदी भागांमध्ये धडक कारवाई करत अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात शहरातील विविध भागात विनाकारण बसणारी टोळकी, मद्यपी आणि नाहक गर्दी करून बसणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
बारामती शहरात आज संध्याकाळी पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे टपोरीगिरी करणारांची चांगलीच भंबेरी उडाली.
बारामती शहरात ही कारवाई सातत्याने सुरू ठेवली जाणार आहे. अनेकजण नियमबाह्यपणे वाहने चालवणे, रस्त्याच्या कडेला बसून
टपोरीगिरी करणे, दारू, सिगरेट, छेडछाड असे प्रकार करताना आढळून येतात. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहितीउपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.
बारामती हे सुसंस्कृत शहर असून शहर आणि परिसरात चुकीच्याकृत्यांना थारा दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बारामतीत आज संध्याकाळी अचानकपणे पोलिसांनी मारलेल्या एंट्रीमुळे अनेकांची चांगलीच गोची झाली. आजच्या कारवाईत
पोलिसांनी विविध भागात दिसणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे व अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेकांनी चांगलाच धसका घेतला. दरम्यान रस्त्याच्या कडेला बसून टपोरीगिरी करणारे, दारू पिऊन सिगरेट ओढत छेडछाड करणारे यापुढे पोलिसांच्या कारवाईस पात्र ठरतील असा इशारा देऊन, विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.