क्राईम रिपोर्ट

धक्कादायक घटना; बहिणीच्या आत्महत्येनंतर पतीने पत्नीची कुऱ्हाडीने केली हत्या

कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती

धक्कादायक घटना; बहिणीच्या आत्महत्येनंतर पतीने पत्नीची कुऱ्हाडीने केली हत्या

कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती

क्राईम;बारामती वार्तापत्र

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादामुळे घरातील दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. अनेक घरगुती प्रश्नाला डोकं शांत ठेवून सोडवणं आवश्यक असतात. रागाच्या भरात अनर्थ होऊन बसल्याच्या अनेक घटना आपण आजूबाजूला पाहत असतो. पुण्यातदेखील असाच प्रकार समोर आला आहे.

कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पती-पत्नी आणि बहीण यांच्यात हा वाद होऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे. पती समीर तावरे, पत्नी वैशाली तावरे आणि बहीण माया सातव यांच्यात रात्री वाद झाल्याने बहीण माया सातव हिने टोकाचे पाऊल उचलत घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान बहिणीने आत्महत्या केल्याची माहिती भाऊ समीर याला कळताच समीर आणि त्याची पत्नी वैशाली तावरे यांच्यात सकाळी वाद झाल्यानंतर या वादातून पती समीर याने पत्नी वैशालीवर कुर्‍हाडीने वार करत तिलाही संपवलं. त्यानंतर स्वतः समीर तावरे यानेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून समीरची प्रकृती सध्या गंभीर आणि चिंताजनक आहे.

त्याच्यावर सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर वैशाली तावरे आणि माया सातव यांचा यात मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. तपासानंतरच सर्व घटनेचा उलगडा होईल. या दुर्दैवी घटनेने परिसरात मात्र शोककळा पसरली आहे. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना असे टोकाचे पाऊल उचलले आहे याबाबत सध्या शिरुर पोलिस सदर घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button