नवी दिल्ली

मोठी घोषणा ; बळीराजाच्या आंदोलनाला मोठं यश,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेत मागितली देशवासियांची क्षमा

ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा होणार

मोठी घोषणा ; बळीराजाच्या आंदोलनाला मोठं यश,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेत मागितली देशवासियांची क्षमा

ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा होणार

प्रतिनिधी

मोदींनी तिन्ही कृषी कायदे मागे घेणार असल्याचं जाहीर केलं. तसंच सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं. यावेळी मोदींनी माफीही मागितली आहे.

मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही, असं मोदींनी जनतेला संबोधताना म्हटलं आहे. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला.

 हे तीन कृषी कायदे कोणते आहेत ?

पहिला कायदा :

आतापर्यंत केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्याच ठिकाणी शेती मालाची खरेदी केली जात होती. पण या सुधारीत कायद्यामुळे समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री करता येणार होती. यामुळे मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे हा यामागचा उद्देश होता.

ई- ट्रेडिंगसाठी व्यवस्था करुन देणे
शेतीमालाचे दर ठरविण्याचा अधिकार हा शेतकऱ्यांनाच नाही. त्यामुळे शेतीमालाला चांगली किंमत मिळावी आणि मालाची लवकरात लवकर विक्री व्हावी हा या ई-ट्रेडिंग मार्कंटचा उद्देश होता. मात्र, याला देखील काही शेतकरी संघटनांनी विरोध केलेला होता.

दुसरा कायदा

कृषी सेवा करार कायदा 2020 यामध्ये कंत्राटीपध्दतीने शेती व्यवसाय करण्याची तरतूद होती. शेतकरी जे पीक घेत आहेत त्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली आहे. भारतात सध्याही काही प्रमाणात अशाप्रकारची कंत्राटी शेती पाहायला मिळते. पण याला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 5 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांना कंत्राटांचा फायदा होणार होणार होता. यामुळे बाजारभावातील तफावतीचा परिणाम हा शेतकऱ्यांवर नाही तर कंत्राटदारांवर होणार होता. यामुळे शेतकरी आणि कंत्राटदार असाच व्यवहार होणार होता तर कोणी मध्यस्ती राहणार नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार होता. शेतकऱ्यांना पिकासाठी ठोक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येणार होती.

तिसरा कायदा

अत्यावश्यक वस्तू विधेयक हा तिसरा कायदा आहे, ज्यावरून वाद होतोय. सरकारने अनेक कृषी उत्पादनं या यादीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणे. यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत. हे निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसंच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल किमती स्थिर राहण्यात मदत होईल. यामुळे ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत होते.

मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो की आमच्या तपस्येत काही कमी पडली असेल. आम्ही काही सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही, असं त्यांनी म्हटलं. पुढे मोदींनी म्हटलं की, आज प्रकाशपर्व आहे.

पण सुधारित कायद्यांना शेतकरी संघटनांचा विरोध होत असल्याने हे कायदे मागे घेण्यात येत असल्याची घोषणाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram