इंदापूर

खाजगी बसच्या धडकेत कर्मयोगीच्या संचालकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगांव च्या हद्दीत घडली.

खाजगी बसच्या धडकेत कर्मयोगीच्या संचालकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगांव च्या हद्दीत घडली.

इंदापूर : प्रतिनिधी

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीचे टायर फुटल्याने तो बदलत असताना मागून येणाऱ्या खाजगी बसच्या चालकाचा ताबा सुटून ठोस लागल्याने झालेल्या अपघातात तिघे जन जखमी झाले.तिन जखमींपैकी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास रंगनाथ देवकाते यांचे चिरंजीव आदित्य विश्वासराव देवकाते वय १८ वर्षे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विश्वास रंगनाथ देवकाते वय- ४५ आणि संतोष अंकुश पवार रा. मदनवाडी ता. इंदापूर जि.पुणे ही अशी जखमी झालेल्यांची नांवे आहेत. हि घटना गुरूवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगांव च्या हद्दीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मौजे गागरगांव गावच्या हद्दीत गुरूवारी दि.१८ रोजी रात्री साडेअकरा दरम्यान ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (ट्रॅक्टर नंबर – एम.एच.४२ क्यू ४१२२) पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जात असताना पुढील ट्राॅलिचा टायर फुटला. ट्राॅलीचा टायर बदलत असताना पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणारी खाजगी बस ( वाहन नंबर एन.एल.०१ बी.१४४०) यावरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्राॅली ( नंबर – एम.एच.१४-एफ-८०४९) हिला पाठीमागून ठोस बसली.त्यामुळे विश्वास रंगनाथ देवकाते,आदित्य विश्वास देवकाते आणि संतोष अंकुश पवार हे तिघेही जखमी झाले.

घटना समजताचं पोलीस मदत केंद्राचे सहायक फौजदार भागवत शिंदे,पोलीस हवालदार उमेश लोणकर व पोलीस नाईक नितीन जगताप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.जखमींना खाजगी वाहनाने इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचार कामी पाठवण्यात आले. उपचार घेत असताना आदित्य विश्वास देवकाते याचा मृत्यू झाला. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram