इंदापूर

कृषी कायदे रद्द ! हा तर शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय : स्वप्नील सावंत

काँग्रेस सदैव शेतकऱ्यांबरोबर असल्याची दिली प्रतिक्रिया

कृषी कायदे रद्द ! हा तर शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय : स्वप्नील सावंत

काँग्रेस सदैव शेतकऱ्यांबरोबर असल्याची दिली प्रतिक्रिया

इंदापूर : प्रतिनिधी

मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले आहे. हा शेतकऱ्यांनी लोकशाही पद्धतीने दिलेल्या लढ्याचा व संघर्षाचा विजय आहे अशा शब्दात काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शुक्रवारी सकाळी प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर बोलताना सावंत म्हणाले की,मोदी सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द व्हावे यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध स्तरावर आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आले. हा शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याचा त्यांच्या एकजुटीचा विजय आहे.

परंतु कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या भारत देशात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी जवळपास सहाशे शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले ही बाब दुर्दैवी आहे.शेतकऱ्यांच्या बरोबर काँग्रेस पक्ष व राहुल गांधी ठामपणे उभे आहेत.काँग्रेस पक्ष सदैव जनहितासाठी काम करणारा पक्ष आहे हे वारंवार सिद्ध झालं आहे.अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली.

Related Articles

Back to top button