स्थानिक

वृक्षारोपण करत लग्नाचा वाढदिवस साजराः गोलांडे दाम्पत्याचा उपक्रम

१३ वा लग्नाचा वाढदिवसा निमित्त

वृक्षारोपण करत लग्नाचा वाढदिवस साजराः गोलांडे दाम्पत्याचा उपक्रम

१३ वा लग्नाचा वाढदिवसा निमित्त

बारामती वार्तापत्र 

सध्या तरूणाईमध्ये लग्नाचा किंवा स्वतः च्या वाढदिवसची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्टी करणे धांगडधिंगा करणे हे आता नित्याचे झाले आहे. परंतु सामाजिक उत्तरदायित्वाची जाणिव काही तरूणवाढदिवसाचे औचित्य साधुन सामाजिक
उपक्रम राबवत असतात. असा एक उपक्रम सोमेश्वर-करंजे (ता.बारामती)येथील लग्नाचा तेरावा वाढदिवस नुकताच राबवला
आहे.

गोलांडे या दाम्पत्याचा १३ वा लग्नाचा वाढदिवसा निमित्त सोमेश्वर-करंजे येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा
करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते नितीन शेंडकर,शरद जगताप तसेच भारतीय पत्रकार संघ अध्यक्ष काशिनाथ पिंगळे,संघटक महंमद शेख, हल्लाकृती समिती अध्यक्ष निखिल नाटकर तसेच इतर पत्रकार मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button